कर्नाटक राज्यात 20 एप्रिल पासून दुचाकी वाहने घेऊन दोघांना फिरण्यास अनुमती देणारा आदेश रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी अवघ्या काही तासांतच यु टर्न घेत आपण बजावलेला आदेश मागे घेतला आहे.
लॉक डाऊन 3 मे पर्यंत असला तरी 20 एप्रिल पासून दुचाकी वरून फिरू शकतात मात्र जिल्ह्याबाहेर जाऊ नये असा आदेश त्यांनी दिला होता मात्र याला विरोध पाहता त्यांनी स्वताच बजावलेला हा आदेश रद्द केला आहे
शनिवारी दुपारी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत चर्चा करत दुचाकी वरून फिरण्याचा आदेश मागे घेतला आहे त्यामुळे आता लॉक डाऊन काळात दुचाकी वरून फिरण्यावर देखील बंदी आली आहे.आय टी बी टी क्षेत्रातील अत्यावश्यक सेवाना सूट देण्यात आली असून उर्वरित सर्वांनी वर्क फ्रॉम होम(घर बसल्या काम) करणे गरजेचे आहे.
एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुचाकीवरून फिरणाऱ्याला परवानगी दिल्यावर लॉक डाऊन अंमलबजावणी करण्यास अडचणी येऊ शकतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी आपण घेतलेला निर्णय काही तासांत बदलला आहे.
दुपारी बजावलेल्या आदेशाची बातमी खालील लिंक मध्ये