कोरोना विषाणूमुळे अनेकांना फटका बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोल्ट्री फाउंड्री ला याचा मोठा फटका बसला होता. अनेक जणांनी चिकन खाणे सोडून दिले होते. मात्र आता हळूहळू गैरसमज दूर होत असल्याने चिकनला अच्छे दिन येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या खवय्ये चिकनकडे वळू लागले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर काही उपद्व्यापी मंडळींनी चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो अशी पोस्ट व्हायरल केली होती.त्यामुळे जनतेने चिकनकडे पाठ फिरवली होती.अनेक पोल्ट्री मालकांनी हजारो कोंबड्या गाडल्याचे फोटो आणि व्हीडिओ प्रसिद्ध झाले होते.सरकारने देखील चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही असे स्पष्टीकरण दिले होते.खुद्द मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी देखील खुलासा केला होता.चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो हा जनतेतील गैरसमज दूर झाला असून आता लोक चिकन खाण्याला प्राधान्य देत आहेत असे सद्य स्थितीवरून दिसून येते.लोक आता चिकन खरेदीसाठी दुकाना समोर रांगा लावून चिकन खरेदी करत आहेत.
कोरोना हा विषाणू कोंबडी तून होतो असा गैरसमज पसरविण्यात आल्याने अनेकांना कोंबडी खाणे अवघड वाटू लागले होते. मात्र अनेक डॉक्टर तसेच तज्ञांनी हा रोग कोंबडी मुळे होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही भीती मुळे अनेकांनी चिकन कडे पाठ फिरवली होती. मात्र आता गैरसमज दूर झाल्याने पुन्हा चिकनच्या मागणीत वाढ झाली असून चिकनला चांगले दिवस येणार असल्याचे दिसून येत आहे.
निर्माण झालेल्या गैरसमजामुळे अनेकजणांनी कोंबड्या जंगलात सोडून दिल्या तर काहींनी शंभर रुपयाला पाच कोंबड्या विकल्या मात्र तरी देखील नागरिकांनी चिकन खाण्याकडे दुर्लक्ष केले होते. आता पुन्हा गैरसमज मिटल्याने अनेक जण चिकन खातन्याकडे वळू लागले आहेत. त्यामुळे आता सिकंदर 180 ते 200 रुपये पर्यंत जाऊन पोचला असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना वादळाच्या तडाख्याने पोल्ट्री उद्योग कोसळला. तसेच पोल्ट्री ब्रीडर्सचे लाखोंचे नुकसान झाले. आता पुन्हा कोंबडीच्या चांगल्या दिवसांकडे लोक चिकन मांसासाठी दुकानांसमोर उभे आहेत. कोंबडीची मागणी झपाट्याने वाढली असून मागणी 180 ते 200 रुपयांपर्यंत वाढली आहे. दोन आठवड्यांपूर्वी, कुक्कुटपालकांना प्रतिकिलोला 50 रुपयांपेक्षा कमी होणारे नुकसान टाळता आले नाही.
काहींनी तर लोकांना विनामूल्य कोंबडीचे वाटप केले. पोल्ट्री मालकांनी कोंबडीची पुरलेली व्हिडिओ व्हायरल झाली होते. अनेक पोल्ट्री मालकांचे लाखो नुकसान झाले. अफवांमुळे लोक कुक्कुटपालनाकडे वळत नाहित. मात्र आता पुन्हा चिकनच्या मागणीत वाढ होत असून अनेक जण मांसाहारी कडे वळले आहेत. याची भीती गायब झाली आहे. त्यामुळेच चिकन कडे लोक वळू लागले आहेत.