एकसंबा (ता. चिक्कोडी) येथे लॉक डाऊनच्या काळात गेल्या 23 एप्रिल रोजी गस्तीवर असणार्या दोघा पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा कमांडोला मारहाण करण्याबरोबरच त्याला बेड्या घालून साखळदंडाने बांधून अपमानास्पद वागणूक दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबलेल्या सीआरपीएफ कोब्रा कमांडोचे नांव सचिन सुनील सावंत असे आहे. सुट्टीवर आलेला सचिन घरासमोर रस्त्यावर आपली मोटरसायकल पुसत होता. त्यावेळी त्याच्या तोंडावर मास्क नसल्याने लॉक डाऊनसाठी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यावरून पोलीस आणि सचिन सावंत यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी सचिनने हातघाईवर येत एका पोलीस कर्मचार्याचा शर्ट हिसकावून काढला. त्यामुळे पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवून सचिन सावंतला अटक करण्यात आली आहे.
*जिल्हा पोलीस प्रमुखांचे स्पष्टीकरण*
दरम्यान, सीआरपीएफ जवानाला बेळगाव पोलिसांकडून साखळदंडात बांधून अपमानास्पद वागणूक दिल्याचे जे वृत्त पसरविले जात आहे ते अर्धवट आणि दिशाभूल करणारे आहे. प्रत्यक्षात कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केल्यामुळे संबंधित सीआरपीएफ जवानाला अटक करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सोमवारी दिले.
सोशल मीडियावर सोमवारी सकाळपासून सीआरपीएफच्या जवानाचा हातकड्या घालून साखळदंड बांधलेल्या अवस्थेतील फोटोसह बेळगाव पोलिसाकडून त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचे वृत्त व्हायरल होत होते. परिणामी जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण्याबरोबरच बेळगाव पोलिसांच्या कृतीचा निषेध केला जात होता. याची तात्काळ दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.
जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 23 एप्रिल रोजी सदलगा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कॉन्स्टेबल लॉक डाऊनची ड्यूटी करण्यासाठी एकसंबा गावात गस्तीसाठी गेले होते. त्यावेळी एका घराबाहेर सचिन सावंत सह 4 – 5 जण गप्पा मारत बसले होते. पोलिसांना पाहून त्यापैकी पाच जणांनी पळ काढला तर सचीन एकटा तेथेच बसून होता. तेंव्हा पोलिसांनी त्याला लॉक डाऊन असल्याने घरात जाण्यास सांगितले. तसेच तोंडाला मास्क घालण्याचा सल्लाही दिला. यावरून वादावादी होऊन त्याचे पर्यवसान सचिनने एका पोलिसाची कॉलर पकडून त्याच्या पोटात लाथ मारण्यामध्ये झाले.
परिणामी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घ्यावे लागले. त्याचप्रमाणे पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी सचिन सावंत याला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. उपरोक्त घटनेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण आपण पाहिले असून सोशल मीडियावर पोलिसांनी सचिनला मारहाण केल्याचे अर्धवट चित्रीकरण प्रसारित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर सोमवारी सकाळपासून सीआरपीएफ कोब्रा कमांडो सचिन सावंत याचा हातकड्या घालून साखळदंड बांधलेल्या अवस्थेतील फोटोसह सदलगा पोलिसाकडून त्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. परिणामी जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण्याबरोबरच सदलगा पोलिसांच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे सचिन नावाच्या सी आर पी एफ कोब्रा कमांडो सोबत पोलिसांची हमरातुमरी त्यानंतर जवानावर घालण्यात आलेली केस…हे प्रकरण केंद्रीय आणि कर्नाटकाच्या गृहमंत्र्यां पर्यंत पोहोचले आहे याबाबत बेळगावचे एस पी लक्ष्मण निंबरगी यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि जवान आणि पोलिसांत झालेली वादवादीची दृश्ये पहा बेळगाव live वर… सविस्तर वृत्त लवकरचं वाचा
चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे सचिन सावंत नावाच्या सी आर पी एफ कोब्रा कमांडो सोबत केवळ मास्क न घातला म्हणून बेड्या…
Posted by Belgaum Live on Monday, April 27, 2020