कर्नाटक शासनाने आज मंगळवारी राज्यातील कोरोना संसर्ग नसलेल्या अथवा अंशतः संसर्ग असलेल्या काही जिल्ह्यातील लाॅक डाऊन शिथील केला आहे. बेळगाव जिल्ह्याला मात्र कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.
राज्यातील बेंगलोर शहर, बेळगाव, म्हैसूर, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, बीदर आणि मंगळूर या जिल्ह्यातील लॉक डाऊनचा आदेश आणि अंमलबजावणी कोणत्याही बदलाविना जैसे थे असणार आहे. या ठिकाणी फक्त जीवनावश्यक संबंधी वस्तूंचा पुरवठा आणि सेवेला परवानगी असणार आहे.
या उलट राज्यातील चा
मराजनगर, कोप्पळ, चिकमंगळूर, रायचूर, चित्रदुर्ग, हासन, शिमोगा, हावेरी, याडगीर, कोलार, दावणगिरी, उडपी आणि कोडगु याठिकाणी जीवनावश्यक संबंधी वस्तूंचा पुरवठा आणि सेवेसह म्युनसिपल कार्पोरेशन व म्युन्सिपाल्टी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्र बाहेरील ग्रामीण भागातील उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी असणार आहे.
बेळ्ळारी, मंड्या, बेंगलोर ग्रामीण, गदग, तुमकुर, चिकबेळ्ळापूर, कारवार व धारवाड येथील तालुक्यातील दुकाने आणि उद्योगधंदे सुरू करायचे की नाही? याबाबतचा निर्णय संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घ्यावयाचा आहे.
Dasharath.mandolkar.D.T.S.Belgaum