संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली तरी कोरोनाशी झुंज देण्यासाठी हा एकमेव पर्याय सरकारने निवडला आहे. मात्र या लॉक डाऊन मुळे तळीरामांची पंचायत होत आहे. त्यामुळे जेथे दारू आहे तेथून आणण्यासाठी तळीराम सुसाट जात आहेत. अशीच घटना बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात दारू आणण्यासाठी गेलेल्यांना नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला आहे.
बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील दोघेजण दारू आणण्यासाठी महाराष्ट्रात गेले होते. किटवाड गावाजवळ त्याने दहा लिटर दारू घेतली. की दारू आणण्यासाठी त्यांनी कडोली गावातील काही जणांकडून पैसे हा दुसरे घेऊन गेले होते. मात्र किटवाड येथील जागरूक नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला आणि त्यानंतर चंदगड पोलीस स्थानकाच्या हवाली करण्यात आले. अशा प्रकारामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून तळीरामांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकांकडून उधारी पैसे घेऊन दारू आणण्यासाठी गेलेल्यांची ही फजिती अनेकांचे हसे करणारी ठरली आहे.
ज्योतिबा ईश्वर रुटेकुटे( वय 28 राहणार कडोली) व नागराज अप्पय्या पाटील (वय 20 राहणार गुंजेनट्टी तालुका बेळगाव) असे त्या संशयित दोघांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची चर्चा मात्र कडोली परिसरात जोरदार सुरू आहे. चंदगड पोलिसांनी त्यांच्याकडून दारूचे कॅन व मोटारसायकल ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बेळगावमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकार्यांनी चंदगड तालुक्यातील बेळगावला जाणारी सर्व मार्ग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सीमावर्ती भागात काही ही गावातील नागरिक दारू साठी महाराष्ट्रात प्रवेश करू लागले आहेत. अशांवर नजर ठेवण्यात आली असली तरी काही छुप्या मार्गाने दारू नेत असल्याचे उघडकीस आले आहे.
किटवाड येथील जागरूक नागरिकांनी संबंधितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्यावर रीतसर गुन्हा नोंद घेऊन त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. 1200 रुपयेची दारू जप्त करण्यात आली असून वाहनाची किंमत पंधरा हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.


