अलतगा गावात औषध फवारणी

0
392
 belgaum

बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची धास्ती ग्रामीण भागातील नागरिकांना लागून राहिले आहे. ग्रामीण भागातील कोरोनांची संख्या वाढल्याने अनेकजण खबरदारी म्हणून औषध फवारणी करत आहेत. बेळगाव तालुक्यातील अलतगा गावातही औषध फवारणी करण्यात आली.

कांगली गल्ली बेळगाव येथील बाळकृष्ण टोपीनकट्टी यांच्या पुढाकाराने अलतगा गावात प्रत्येक घरावर औषध फवारणी करण्यात आली. याचा सर्व खर्च बाळकृष्ण यांनी उचलला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलतगा बरोबरच इतर गावात ही त्यांनी स्वखर्चाने औषध फवारणी केली आहे. त्यामुळे त्यांचे सामाजिक कार्य मोठी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या कार्याचे कौतुक तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लीकार्जुन कलादगी यांनीही केले.

या कार्यक्रमावेळी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, उपाध्यक्ष संजय पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा चंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, मनोहर भातकांडे, ग्रामविकास अधिकारी आशा रायकर, गणपत सुतार, पिराजी पावशे, रमेश कांबळे, रमेश पाटील, तुकाराम चौगुले,नारायण चौगुले, बाळू चौगुले, लक्ष्मण घुगरेटकर, अशोक घुगेरेटकर, पितांबर पाटील, देवाप्पा आलोजी, ईरप्‍पा जाधव, प्रकाश उघाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 belgaum

औषध फवारणी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाच वार पाळण्याचे ठरविण्यात आले. सोमवार आणि शुक्रवार कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देण्यात येणार नाही तसेच गावातून बाहेर जाणेही टाळावे असे ठरविण्यात आले. सध्या कोरोनाचे संकट संपेपर्यंत तरी साऱ्याने घरात राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. चेतन कांबळे यांनी या कामी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.