कर्नाटक राज्यात दि 20 एप्रिल पासून दुचाकी वाहने घेऊन फिरण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी दिली.
लॉक डाऊन 3 मे पर्यंत असले तरी 20 एप्रिल पासून दुचाकी वाहन घेऊन फिरण्यास अनुमती देण्यात आली आहे.दुचाकीवरून दोन व्यक्ती प्रवास करू शकतात.पण जिल्ह्याबाहेर कोणालाही जाता येणार नाही हे देखील मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले.
कंटेन्मेंटन झोन मधील व्यक्तींना मात्र दुचाकीची सूट मिळणार नसल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.बांधकाम, आयटी क्षेत्रातील उद्योगांना लॉक डाऊन काळात उद्योग सुरू करायला देण्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे राज्यात हॉट स्पॉट आणि रेड झोन मध्ये असलेल्या लॉक डाउनचा फज्जा उडणार नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.केवळ जिल्ह्याबाहेर न जाने दुचाकी वरून दोघे जण फिरू शकतात या मुख्यमंत्री बी एस एस येडीयुरप्पा यांच्या वक्तव्यामुळे अनेकांत वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला आहे. बेळगाव जिल्ह्यात याची अंमलबजावणी होते की नाही याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे