बेळगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र फोटो सेक्शनसाठी केवळ झाडे लावा झाडे जगवा असे नारा देऊन त्यानंतर त्या दुर्लक्ष करण्यातच अनेकांनी धन्यता मानली आहे. विशेष म्हणजे त्या रोपाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असतानाच अनेक झाडे खराब झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी त्यांची देखभाल करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोपटी नुसती लावली म्हणजे आपलं काम झालं असं कधी होत नाही.तर त्या रोपांची नियमित काळजी घेणे तितकाच महत्त्वाचा आहे. उद्योग खात्री मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक झाडं कुचकामी ठरत आहेत. दरवर्षी वन खात्याच्या माध्यमातून उद्योग खात्रीतून मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झाली आहे. मात्र ती किती जगली याकडे मात्र त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
आपण ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे रोपट्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. रोपट्याला कीड लागली की इतर बदल झाडालाही किडीची लागण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक रोपाची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. यापुढे तरी देखभाल यासाठी मजूर नेमून त्यांची देखभाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोपट्यांना नित्यनेमाने पाणी घालणे गरजेचे आहे. याचबरोबर परिसरातील माती भुसभुशीत ठेवून त्यांचं देखभाल करून त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा झाडे तग धरतील तेव्हा पृथ्वीवरील पर्यावरणावर आपण ताबा मिळवू शकेल. त्यामुळे छोट्या रोपांची देखभाल करण्याची गरज व्यक्त होत आहे.