नियती फौंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून बेळगाव शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या महिलांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे.नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली रविवारी 8 रोजी सायंकाळी हॉटेल इफा येथे हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निर्झरा चिट्टी-बेळगाव भागातील धाडसी महिला म्हणून नावलौकिक-परिचित महिला सर्प मित्र -सर्प वाचवत दिल पर्यावरणासाठी योगदान
मंगला मठद-बेळगावात क्लासिकल संगीत क्षेत्रात कार्य-सामाजिक कार्यातून समाज प्रबोधन
सविता कांबळे-आजारी असणाऱ्या वृद्ध व रुग्णांना सेवा सुश्रुषा करणारी बेळगावातील एक नाव लौकिक असलेली कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून कार्य-अनेकांचे वाचवलेत जीव
वरदा कुलकर्णी-बी के मॉडेल मैदानावर पाचशे महिलांनी एकाच वेळी एकाच सुरात वंदे मातरम म्हटलं त्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
वंदना पुराणिक-बेळगावात महिलांसाठी काम करणाऱ्या अवेक(awake)या संस्थेच्या माध्यमातून कार्य
प्रज्ञा दीदी-चिन्मय मिशनच्या माध्यमातून अध्यात्मिक क्षेत्रात कार्य व सामाजिक योगदान
आरती भंडारे-पाण्याचा अपव्यय टाळा यासाठी अनेक ठिकाणी जनजागृती पाणी वाचवा यासाठी शाळा कॉलेज मधून प्रबोधन
सफिना जोसेफ: महिला हक्क आणि नारी शक्ती बळकटीकरणसाठी आपल्या संस्थेतून कार्य
शामल बेळगावकर: खेळाडू कुस्तीपटू या खेळात मेडल्स पटकावले
या कार्यक्रमाला होम मिनिस्टर महिलांच्या खेळाचा अंतिम सामना तर अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.गजानन भातकांडे शाळेच्या प्राचार्य दया शहापूरकर व चिटणीस शाळेच्या प्राचार्य नविना शेट्टींगार उपस्थित राहणार आहेत.