देशव्यापी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगावात किंमतीपेक्षा अधिक रक्कम घेत साठेबाजी करून भाववाढ करणाऱ्या वर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांनी दिला आहे
बेळगाव शहरासह ग्रामीण भागात किराणा दुकानदार दूध विक्रेते इतर अक्षरशः लूट केली जात असल्याची तक्रारी वाढल्या होत्या.त्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून सर्वत्र संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा गैरफायदा शहरासह विशेष करून बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील किराणा दुकानदार सह जीवनावश्यक वस्तू विकणारे घेत आहेत. या दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तूंसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत अश्यावर डी सी बोंमनहळळी यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.रविवारी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी इशारा दिलाय.
दूध विक्रेते पेट्रोल पंप व इतर जीवनावश्यक वस्तूंचा मोठया प्रमाणात साठा करणाऱ्यावर देखील नजर ठेवली जाणार असून अश्या वर कडक कारवाई करू असे जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी म्हटले आहे.भाववाढी विरोधात या अगोदर बेळगाव live ने देखील आवाज उठवला होता बेळगाव शहरासह ग्रामीण भागात अव्वाच्या सववा किंमतीत किराणा दुकान दार लुटत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते.
इथं किराणा दुकानदार करताहेत सामान्यांची लूट