कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शिक्षण खात्याने एक महत्वाचा आदेश बजावला आहे.उद्यापासून पहिली ते सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना उद्यापासूनच उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.
पहिली ते सहावीच्या परीक्षा संपल्या किंवा सुरू असल्या तरी परीक्षा रद्द करून उन्हाळी सुट्टी द्या असा आदेश बजावण्यात आला आहे.सातवी ते दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रका प्रमाणे होणार आहेत.त्यांना उद्यापासूनच अभ्यासासाठी सुट्टी देण्यात यावी असाही आदेश बजावण्यात आला आहे.
आठवी आणि नववीच्या परीक्षा 23 तारखेच्या आत घेण्यात याव्यात आणि त्यांनाही अभ्यासासाठी सुट्टी देण्यात यावी असा आदेश बजावण्यात आला आहे.