Monday, May 6, 2024

/

आरोग्य खात्यासह शहरवासीयांना दिलासा ‘तो’ रुग्ण कोरोनाग्रस्त नाही

 belgaum

बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या “त्या” संशयित रुग्णांच्या कोरोना विषाणू संदर्भातील चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्हा आरोग्य खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याचप्रमाणे शहरवासीयांनाही दिलासा मिळाला असून तर्कवितर्कांवर पडदा पडला आहे.

काल 60 वर्षीय इसमाला कोरोना लागण झाली नसल्याचे डी एच ओ डॉ एस व्ही मुन्याळ यांनी माहिती दिली आहे.

जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरासह भारतात दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या गुरुवारी एक कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला होता. सदर रुग्णाला सिव्हील हॉस्पिटल आवारातील एका स्वतंत्र इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून चांचणीसाठी आवश्यक रक्त आदी वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते.

 belgaum

सदर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेDistrict hospitalत धाडण्यात आले होते. या नमुन्यांच्या चांचणीअंती संबंधित रुग्णाला विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेने तसा अहवाल बेळगाव जिल्हा रुग्णालयाकडे धाडला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला संबंधित 60 वर्षीय रुग्ण हा केरळहून आलेला असून सर्दी, खोकला व तापामुळे त्रस्त झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये दाखल दाखल झाला होता. दरम्यान वैद्यकीय चांचणीत सदर रुग्णाला करोना विषाणूचा संसर्ग झालेला नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोग्य खात्यासह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळे बेळगावात सध्या तरी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे संबंधित रुग्णासंदर्भात व्यक्त केल्या जाणाऱ्या तर्कवितर्कांवर अखेर पडदा पडला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.