कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेळगाव जिल्ह्यात सरकारने लॉक डाऊन जाहीर केले आहे.हे लॉक डाऊन 31 मार्च पर्यंत राहणार आहे.बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोव्याची हद्द जवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.या लॉक डाऊनची कार्यवाही पोलिसांनी सोमवारी सकाळपासून सुरू केली आहे.
दूध विक्री केंद्रे,डेअरी,भाजी विक्री,किराणा दुकाने, धान्य दुकाने आदी अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी आहे.पोलिसांनी सकाळी खडेबाजार पासून लॉक डाऊन कार्यवाहिला प्रारंभ केला.कपड्याची दुकाने,इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आदी दुकाने पोलिसांनी बंद करायला लावली.
हॉटेल सुरू राहणार आहेत पण हॉटेल मध्ये बसून खायला परवानगी नसून पार्सल घरी घेऊन जायचे आहे.कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पोलीस खात्याने लॉक डाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करायचे ठरवले आहे.
गणपत गल्लीतील फ्रुट मार्केट मध्ये खडे बाजार ए सी पी चांद्रप्पा यांनी फळ विक्रेत्यांना गाड्या हलवायला लावल्या तर शहरातील अन्य भागात देखील पोलिसांनी मोहीम चालू केली आहे.सकाळी अनेकांनी दुकान चालू केली होती मात्र 144 कलम लागु असल्याने दुकान बंद केली जात आहेत.