एस के ई संस्थेच्या आरपीडी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बेळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन सोमवारी सकाळी 11 वाजता आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन. डी. हेगडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून आर एल एस महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षण संचालक जी. एन. पाटील व बेळगाव बी. इ. ओ. कार्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख एल. बी. नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ श्रीमती शोभा नाईक होत्या.
वैष्णवी काकतीकर हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. सी. एम. मुन्नोळी यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. शिंदे यांनी आभार मानले. सलोनी पाटील आणि देवयानी शहापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
शारीरिक शिक्षण संचालक रामकृष्ण एन. यांनी स्पर्धेच्या नियमांची माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या 18 संघांनी भाग घेतला आहे. बेळगावच्या हनुमान स्पोर्टचे संचालक आनंद सोमाण्णाचे हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत.