डायबेटिक फूट’ ही अनेक वर्षाच्या मधुमेही रुग्णांमध्ये मधुमेहामुळे पायांच्या तक्रारींना मिळून पडलेली संज्ञा आहे. जेव्हा मधुमेह आटोक्यात रहात नाही, तेव्हा यकृत, किडनी, रक्तवाहिन्या, मांसपेशी, डोळे असा सगळ्यांवरच त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
कारणे- १. पादत्राणे- व्यवस्थित न बसणारे चप्पल/ बूट घातल्याने पायाला जखमा होऊ शकतात/ घटे पडू शकतात त्यामुळे चिघळणार्या जखमा होतात.
२. चेतनतंतूहास- मधूमेहामुळे चेतनतंतूचा हास होतो व त्यामुळे होताना वा झाल्यावर संवेदना न झाल्यामुळे जखम चिघळते.
३. रक्ताभिसरण- मधुमेहामुळे सामान्यता: रक्ताभिसरण , रक्तपुरवठा, व्यवस्थित न झाल्यामुळे जखमा भरून येत नाहीत.
४. जंतुसंसर्ग- बुरशी संसर्ग (फंगल इंन्फेक्शन) तळपाय किंवा नखांना झाल्यामुळे नखं त्वचेत घुसून जखम होऊ शकते.
५. धुम्रपान- धुम्रपानामुळे/ अतिरिक्त तंबाखू सेवनामुळे पायाच्या रक्तवाहिन्या संकुचित होऊन आजारात जास्तीची भर पडते.
लक्षणे
१. मधुमेही रुग्णांना पायाला स्पर्शाची भावना कमी होते. त्यामुळे जखमा होताना व झाल्यानंतर काहीही कळत नाही.
२. डायबेटिक फूट अल्सर- या बर्या न होणार्या जखमा पांढरट असतात. दर्गंधी येत असते, कुजत सडत राहतात. त्या बाजूचे त्वचेचे अस्तर खडबडीत असते.
३. अशा जखमा होऊन /पाय किंवा पायाचा भाग सडतो व गँग्रीन होते. त्यामुळे तो भाग कापून टाकण्याशिवाय पर्याय रहात नाही.
४. मांडीत, पोटर्यांमध्ये कमरेच्या खूब्यात कळा येतात.
होमिओपॅथिक ट्रिटमेंट
अशा केसीसमध्ये होमिओपॅथीक औषधे अक्षरश: वंडर ड्रग सारखी काम करतात. जखमेचा निचरा होऊन वरून पुन्हा त्वचा व्यवस्थित तयार होण्यापर्यंत औषधं द्यावी लागतात. कालावधी बराच असतो. पाहूया काही औषधांची उदाहरणे.
१. यूरेनियम नायटेट- मधूमेह आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त कित्येक रुग्णांची रक्तशर्करा अगदी अनेक प्रकारच्या गोळ्या, इन्शुलीन घेऊनही कमी होत नाही. अशा रुग्णांना युरेनियम नायट्रेटने फायदा होतो.
२. फॉस्फेरिक ऍसिड- मधुमेहाने क्षीण झालेले रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त.
३. ऍसीड फ्ल्यूर- खोलवर झालेल्या न बर्या होणार्या, कुजणार्या जखमांवर उपयुक्त.
४. इन्सुलीन- इन्सुलीन पासूनच हे होमिओपॅथिक औषध बनवले जाते व. त्यामुळे मधुमेह व मधुमेहामुळे होणारी कॉम्पलीकेशनस बरी होण्याला मदत होते.
एक वाचक वर्ग असा असतो जो आजाराच्या माहितीपेक्षा उपचार बारकाईने वाचतो मग अशी औषधं आणून स्वत:वर किंवा कुटुंबीयांवर त्याचे प्रयोग सुरू होतात. परंतु हाफ नॉलेज इज डेंजर्स या उक्तीप्रमाणे सांभाळण्यापेक्षा हेळसांड होऊ शकते हे ध्यानात असणे गरजेचे आहे. तज्ज्ञांचा सल्ला कधीही उचीत!
– डॉ. सोनाली सरनोबत, एम. डी.
केदार क्लिनिक- ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक-०८३१-२४३१३६४
Trending Now