माजी नगरसेवकांना महानगरपालिकेचे कर्मचारी दाद देत नसल्याचे एका घटनेवरून सिद्ध झाले आहे.माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या वर्क इन्स्पेक्टरना कचऱ्याची उचल केली जात नाही .
यासाठी आपण येऊन पाहणी करा असे सांगितले.पण वर्क इन्स्पेक्टर कलावती यांनी त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघेला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली.नंतर वर्क इन्स्पेक्टर कलावती यांनी वाघेला यांना फोन करून वरिष्ठांकडे तक्रार का केला म्हणून विचारणा केली.त्यावर वाघेला यांनी तुम्ही सांगितलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केला म्हणून तक्रार केल्याचे सांगितले.
तुम्हीं कोणकडेही तक्रार करा काय फरक पडत नाही असे बोलून फोन बंद केला.त्यामुळे वाघेला यांनी सादर विषय माजी नगरसेवकांच्या बैठकीत उपस्थित करून चर्चा केली.त्यानंतर आयुक्तांना निवेदन देऊन वर्क इन्स्पेक्टरवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवकांच्या संघटनेने केली आहे.