कोरोनाग्रस्त संशयित रुग्णाचे बंगलोर येथे पाठवलेले पाच रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
आजपर्यंत एकूण दहा रुग्णाचे नमुने बंगलोर आणि शिमोगा येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते.हे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.
कोरोनाबाबत जनतेने घाबरून न जाता सरकारने आणि प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक ती सगळी उपाय योजना केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी सांगितले आहे.