प्राणघातक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार उचगांव येथे दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी श्री मळेकरणी देवीची यात्रा येत्या मंगळवार दि. 31 मार्च 2020 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायाने राज्य शासनाने एका आदेशाद्वारे विविध सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यामध्ये यात्रोत्सव साधेपणाने साजरे केले जावेत लोकांनी मोठ्या संख्येने जमू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे. तथापि उचगाव येथील मळेकरणी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक जमत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी सदर यात्रा येत्या 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील पश्चिम दर मंगळवारी आणि शुक्रवारी मळेकरणी देवीची यात्रा भरते विवाह झाल्या नंतर मळेकरणी यात्रा अनेक जण साजरी करत असतात आता कोरोनाचा इफेक्ट यात्रेला देखील बसला आहे
खबरदारीचा उपाय म्हणून उचगाव ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीने हा निर्णय घेतला आहे. तेंव्हा येत्या 31 मार्च पर्यंत यात्रेचे एकूण 5 वार येतात, तथापि या दिवशी श्री मुळेकरणी यात्रा होणार नाही, याची नोंद घेऊन भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.