कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेचा उद्या सोमवार दि. 23 मार्च रोजी होणारा अंतिम पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्यात गेल्या 4 मार्च बारावी परीक्षेला सुरुवात झाली होती. कोरोनाच्या भीतीखाली झालेल्या बारावी परीक्षेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील कोणताही विद्यार्थी डिबार झाला नाही हे विशेष होय. सदर परीक्षा सुरू झाल्यानंतर कांही दिवसातच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध घालण्यात आले होते. ही बारावी परीक्षा आत्तापर्यंत अडथळ्याशिवाय पार पडली होती.
तथापी आता कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या सोमवार दि. 23 मार्च रोजी होणारा परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुमारे 19 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.