Sunday, November 17, 2024

/

‘कोरोना’संदर्भात बेळगाव मनपानेही उचलावीत आवश्यक पावले

 belgaum

बेंगलोरमध्ये 4 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने या प्राणघातक विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बेंगलोरातील जलतरण तलाव बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने बेळगावतही महानगरपालिकेकडून आवश्यक खबरदारी घेतली जावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगलोर शहरात जगामध्ये दहशत माजविणाऱ्या प्राणघातक कोरोना विषाणू बाधित 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील एक जागरूक नागरिक आणि कलाकार प्रशांत संबरगी यानी धोरणाचा संसर्ग टाळण्यासाठी बेंगलोर शहरातील महानगरपालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव बंद ठेवले जावेत अशी मागणी महापौर गौतमकुमार यांच्याकडे केली आहे. प्रशांत संबरगी यांची मागणी रास्त असल्यामुळे यासंदर्भात लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेनेही आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे, असे स्थानिक जागरूक नागरिकांचे मत आहे. प्राणघातक कोरोना विषाणूचा संसर्ग कसा होतो हे आता जगजाहीर झाली आहे. तेंव्हा महापालिकेनेही आपल्या मालकीचे बेळगावातील जलतरण तलाव त्याचप्रमाणे खाजगी जलतरण तलाव कोरोना विषाणूचे संसर्ग केंद्र बनणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. बेळगावात सुदैवाने अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

जलतरण तलावाच्या ठिकाणी समाजाच्या सर्व थरातील मंडळी जलतरणाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी अतिशय संसर्गजन्य असणाऱ्या कोरोनाचा प्रसार होण्यास वेळ लागणार नाही. तेंव्हा जिल्हा आरोग्य खात्याप्रमाणे पूर्व खबरदारी घेत बेळगाव महानगरपालिकेने देखील जलतरण तलाव तसेच आपल्या मालकीच्या सार्वजनिक ठिकाणांच्या जागी कोरोना विषाणूसंदर्भात आवश्यक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.