Wednesday, November 27, 2024

/

जगन्नाथाच्या नावे त्या कंत्राटदाराने केलाय भ्रष्टाचार

 belgaum

स्वतःला जगन्नाथाचा भक्त म्हणून घेणाऱ्या आणि जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तालुक्यातील पूर्व भागातील एका कंत्राटदाराने त्याच नावे भ्रष्टाचार केल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे त्या कंत्राटदाराला जगन्नाथ पावणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. लाखोंची माया जमवुन जगन्नाथाचा भक्त म्हणून मिरवणार्‍या त्या कंत्राटदाराने आता तरी शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत मध्ये एका किरकोळ कामावरून त्याने आज मोठा दबदबा निर्माण केला आहे. ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत मधील कामे ही आता तोच करू लागल्याने इतरांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. जगन्नाथाचा भक्त म्हणून मिळवणाऱ्या आणि भ्रष्टाचाराने बक्कळ माया कमावणाऱ्या त्या भक्ताला जगन्नाथ तरी पावणार का? असा सवाल जोर धरू लागला आहे.

निकृष्ट दर्जाची कामे करून बक्कळ माया जमवून भ्रष्टाचाराची ती रक्कम एका संस्थेतून पांढरी करून घेण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. सुरुवातीला खाण्यापिण्याचे वांदे असताना आज त्याच्याच छत्रछायेखाली एका सरदाराला कामाला ठेऊन आपली भरभराट करून घेतली आहे. त्यामुळे राजेशाहीत मिळवणाऱ्या त्या कंत्राटदाराच्या पाळेमुळे खोदून काढण्यासाठी आयकर विभागाने धाड टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.

एका सरदाराला हाताखाली ठेवून ग्रामीण मतदारसंघ, यमकनमर्डी मतदार संघ आणि दक्षिण मतदारसंघात बरीच कामे त्याने केल्याची चर्चा आहे. निकृष्ट दर्जाचे कामे करून त्यातून कोट्यावधीची माया जमवण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे सरदाराला कामाला लावून आपण राजेशाहीत मिरवणाऱ्या त्या कंत्राटदाराला चाप बसण्याची गरज व्यक्त होत आहे.

जगन्नाथाच्या भक्तीतुन बोध घेण्याचे सोडून नको त्या उचापती करण्यात धन्यता मानणाऱ्या त्या कंत्राटदाराला कधी सद्बुद्धी येणार अशी चर्चा सुरू आहे. जगन्नाथाच्या नावे अनेक गैर प्रकारही केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मोठा भक्त असल्याचे दाखवून अनेकांना लुबाडण्यातच धन्यता मानणाऱ्या त्या कंत्राटदाराची चौकशी होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.