सतत कार्यरत राहणारे अष्टपैलू उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता सुधाकर पाटणकर .आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या पुर्वाश्रमीच्या सुनीता नारायण फाळके.सांगली हे त्यांचे माहेर.बीएस्सी पदवी त्यांनी संपादन केली आहे. सुनीता यांनी शाळेत असल्यापासूनच त्यांनी आपली चमक दाखवली होती.
शाळेत पहिल्या पांच नंबर मध्ये नेहमी येणारी म्हणून शाळेत ओळख होती.त्या बरोबरच कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाली तर हमखास बक्षीस घेऊन येणारी म्हणूनही वेगळी ओळख निर्माण शिक्षक ,विद्यार्थ्यांत त्यांनी केली होती.वक्तृत्व,गाणं,निबंध लेखन,पाठांतर,हस्ताक्षर स्पर्धांमध्ये नेहमी बक्षीस ठरलेले असायचे.
केवळ अभ्यासात नव्हे तर खेळातही सुनीता यांनी आपली नाममुद्रा उमटवली होती. रिंग टेनिस हा खेळ तेव्हा खूपच प्रचलित होता.इयत्ता 7 वी ते 11 वी पर्यंत दरवर्षी त्याची चॅम्पियनशीप त्यांना मिळत होती.महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघातून युनिव्हर्सिटी पातळीवर अनेक वेळा आपले कौशल्य दाखवले होते.
1976 साली सुधाकर पाटणकर यांच्याशी विवाह झाला.बेळगावातील सुप्रसिद्ध लोणच्याचे उत्पादक के.सी.पाटणकर यांची सून झाल्या.लग्नानंतर त्यांनी
मराठी विषय घेऊन एम्. ए.केले.कविवर्य निकुंब,प्रसिद्ध लेखक अनंत मनोहर,प्रा.विजया धोपेश्वरकर,प्रा.गाडगीळ,प्रा.
बेळगावमधील शारदोत्सवात विविध स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत.अनेक एकांकिका,एकपात्री प्रयोग सादर करून दर तीन वर्षांनी सादर होणाऱ्या तीन अंकी नाटकात पुरुष भूमिका केल्या आहेत.राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून काम केले करून समाजमनात राष्ट्रभावना जागृत करण्याचे कार्य केले आहे.जवळजवळ 24 वर्षे बालनाट्य शिबिर घेऊन मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले आहे.
शिबीरांमधून मुलांना,स्फूर्तिगीत, देशभक्तीपरगीत,सूर्यनमस्कार,यो गासन,त्याचबरोबर नाटकाला पूरक खेळ,पुस्तकांचे वाचन निवेदन कसे करायचे?मुलाखत कशी घ्यायची?अशा अनेक गोष्टी शिकवणे,एकंदरीत व्यक्तिमत्व विकास हेच हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केलाय.
हे सगळे करत असतानाच दरम्यान 2001 साली बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स ही पदवी संपादन केली.तसेच पत्रकारितेचा सर्टिफिकेट अभ्यासक्रम पूर्ण केला.
पालकांचे,विद्यार्थ्यांचे,इतरही नाते सम्बधातील लोकांना समुपदेश करीत असे,म्हणून post graduate diploma in counseling psychology केला.
सकाळ,पुढारी,तरुण भारत मध्ये विविध विषयांवरील लेखन प्रसिद्ध झाले आहे.आकाशवाणी सांगलीवर विविध विषयांवर
गेस्ट talker,विविध विषयांवर व्याख्याने दिली.मुलांसाठी ‘मनामनातील राजा,शिवाजी राजा’हे नाटक मुलांसाठी लिहिले,त्याचे 18 प्रयोग निरनिराळ्या ठिकाणी केले.त्या लेखनाला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.
1994 साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘चारचौघी’या नाटकातील आईच्या भूमिकेसाठी पारितोषिक,2001 साली ‘हिमालयाची सावली’या नाटकातील बायो च्या भूमिकेसाठी पारितोषिक.महाराष्ट्रातील पारंपारिक स्त्री गीतांवर आधारित ओवी ते अंगाई या कार्यक्रमाचे लेखन,दिग्दर्शन आणि सादरीकरण केले.याचे 68 प्रयोग विविध ठिकाणी केले.
एकांकिका बसवणे,कथाकथन,निवेदन,वक्तृत्वा साठी, नाटकासाठी मार्गदर्शन करते,लिहून देतात.
अनेक कार्यक्रमांचे निवेदन,सूत्रसंचालन
केले आहे.
अनेक स्पर्धासाठी परीक्षक म्हणून काम केले आहे.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केले आहे.गेली पाच वर्षे लोकांना उत्तम खायला घालावे,या हेतूने कडबोळी,चकली,चिवडा,चिरोटे,शकरपा ळी,नाचोज,लाडू असे पदार्थ बनवण्याच उद्योग सुरू केला आहे..
या वर्षीचा आविष्कार उद्योगिनी पुरस्कारही त्यांना लाभला आहे.