येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या खटल्यांची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरु आहे. गुरुवारी काही कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 21 एप्रिल रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.
गुरुवारी खटला क्रमांक 166/15 ची सुनावणी होणार होती. येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे सार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खटल्यामध्ये येळ्ळूरच्या कार्यकर्त्यांच्यावतीने वकील शामसुंदर पत्तार, वकील हेमराज बेंचण्णावर हे काम पाहत आहेत. गुरुवारी न्यायाधीश गैरहजर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. गुरुवारी 17 कार्यकर्ते उपस्थित होते. मात्रकाही कारणास्तव अनेक कार्यकर्ते अनुपस्थित राहिले होते.
या खटल्यामध्ये नामदेव विठ्ठल कदम, नागराज दौलत कुगजी, हनुमंत लुमान्ना कुगजी, राजू जोतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, आनंद यल्लाप्पा मुचंडी, मारुती महादेव अष्टेकर, जयसिंग यल्लाप्पाअष्टेकर, दीपक बाबुराव खादरवाडकर, पवन गजानन पोटे, उत्तम तुकाराम धामणेकर, हणमंत फकिरा धामणेकर, जयवंत गंगाराम टक्केकर, सुनीलगुरुराजमुतगेकर, सदानंद यल्लाप्पा पोटे, प्रशांत शंकर टक्केकर, परशुराम यल्लाप्पा धामणेकर, मनोहर यल्लाप्पामजुकर, राजू विठ्ठल मासेकर, पुंडलिक विष्णू जाधव, परशुराम गणपती जाधव, सुरज यल्लाप्पा घाडी, बाळू शंकर धामणेकर, रजत परशुराम संभाजीचे,कपिल मल्लाप्पा भोवी, बसवराज शिवाप्पा कलमठ, विकास विलास नंदी, परशुराम यल्लाप्पा नंदी, विलास मोनाप्पा नंदीप्पा नारायण मुचंडी यांचा समावेश होता. मात्र यामधील काही जण हजर तर काही जण गैरहजर राहिले.