बेळगावात दि 28 रोजी होणाऱ्या भव्य प्रादेशिक रोजगार मेळाव्यात दोनशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यातील युवक,युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसांच्या प्रादेशिक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवबसवनगरमधील एस जी बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आवारात प्रादेशिक रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.28 आणि 29 फेब्रुवारी असे दोन दिवस हा रोजगार मेळावा चालणार आहे.बेळगाव,धारवाड जिल्हा प्रशासन,कौशल्यभिवृद्धी आणि उद्योजक खाते,उद्योग प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आय टी बी टी ,ऑटोमोबाईल,मेकॅनिकल,मार्केटिंग,सेल्स अँड रिटेल,टेलिकॉम,बीपीओ,टेक्सटाईल,बँकिंग,फायनान्स,इन्शुरन्स,हॉस्पिटल,औषध उद्योग,हेल्थकेअर,उत्पादन,वाहतूक,हॉस्पिटॅलिटी,होम नर्सिंग, आहार संस्करण,गारमेंट्स, सिक्युरिटीसह अनेक कंपन्या,उद्योग रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
शैक्षणिक पात्रतादहावी पास किंवा नापास,बारावी,आय टी आय,डिप्लोमा,कोणतेही पदवीधारक ,एम बी ए,स्नातकोत्तर पदवीधर आणि अंतिम वर्षात शिकत असलेले आणि लगेच कामावर रुजू होणारे या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.
युवक ,युवतींचे शिक्षण आणि कंपन्यांची आवश्यकता या नुसार तरुण,तरुणींना ओळखपत्र देण्यात येणार असून त्याच्या आधारे मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुण,तरुणी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक
9449702768, 7892924199 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Iti electroplating