रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या रोटरी – केएलई डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभ बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
येळ्ळूर रोड, बेळगाव येथील सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल येथे होणाऱ्या या समारंभास उद्घाटक म्हणून केएलई सोसायटीचे चेअरमन व काहेर विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून यूएसएमचे उपकुलगुरू डॉ. फैसल रफिक बीन महद अदिकन आणि युएसएम बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे चेअरमन डॉ. हरिनारायण नडिवीरन उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी पीडीजी रो. अविनाश पोतदार, पीडीजी रो. प्राणेश जहागीरदार, डिस्ट्रि. गव्हर्नर रो. गिरीश मसुरकर, आयपीडीजी रो. रवी कुलकर्णी, रो. दिलीप साळगांवकर, युएसएम विद्यापीठाचे उप-उपकुलगुरू अल्ड्रीन बिन अब्दुल्ला आणि केएलई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर निमंत्रित पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
रोटरी केली डायलिसिस सेंटरचा प्रकल्प उभारण्यासाठी ग्लोबल ग्रँट नं जीजी 1983482 अंतर्गत रोटरी फौंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी क्लब ऑफ बाहीआ आरआयडी 4391 ब्राझील यांचे सहकार्य लाभले आहे.
बेळगाव शहरात रोटरी क्लब आॅफ बेळगावचा 79 वर्षाचा सामाजिक सेवेचा इतिहास आहे. रोटरीने शहरात अनेक स्वच्छतागृह उभारून त्यांची व्यवस्थित निगा राखली आहे. या व्यतिरिक्त या क्लब तर्फे स्विमिंग पूल, सायफेअर, स्काॅ आणि जानेवारी महिन्यात होणारा अन्नसो हे उपक्रम दरवर्षी ठरलेले असतात. या उपक्रमांमधून जमा होणारा निधी खऱ्या सामाजिक कारणांसाठी खर्च केला जातो. या पद्धतीने गेल्या 2018 19 साली जमा झालेला निधी गणपत गल्ली आणि पोट रोड बेळगाव येथे स्वच्छतागृह (टॉयलेट ब्लॉक्स) उभारणीसाठी केला गेला. रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी फाउंडेशनच्या साथीने रोटरी क्लब ऑफ बेळगावने अनेक जागतिक निधी प्रकल्प राबविले आहेत. त्यामध्ये हॅप्पी स्कूल प्रकल्पाअंतर्गत 15 शाळांना टॉयलेट ब्लॉक्स, हात धुण्याची जागा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केएलई हॉस्पिटलशी संलग्न त्वचा पिढी, नेत्र दर्शनशी संलग्न नेत्रपेढी आणि आता रोटरी केएलई डायलिसिस सेंटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.