गेल्या दोन महिन्यापासून बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सदर रिक्षा स्टँड त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव रेल्वेस्थानक आवारात दोन महिन्यापूर्वी प्रीपेड ऑटो रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले होते मात्र अवघ्या एक महिन्यातच सदर स्टॅन्ड बंद करण्यात आले आहे महिन्याभरापूर्वी आमदार एडवोकेट अनिल बेनके यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन दोन दिवसात प्रीपेड ऑटो रिक्षा स्टॅन्ड पलांचीत स्थलांतरित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र आता जवळजवळ महिना होत आला तरी स्टँड असे स्थलांतर झालेले नाही.
यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी खुद्द आमदारांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सध्या प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे रेल्वे स्थानकाबाहेर येऊन ऑटोरिक्षा पकडताना प्रवाशांना धावपळ करावी लागत आहे. शिवाय काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे.
विकास कामांसाठी बेळगाव रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ते दुसऱ्या ठिकाणी सुरु करण्यात आले. त्याच आवारात ऑटोरिक्षा लावल्या जात होत्या असल्यामुळे त्या ठिकाणी प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात आले होते, जे महिन्याभरात बंद झाले. सध्या या रेल्वे पोलिस स्थानकाच्या मागील बाजूला स्टॅन्ड सुरू करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. तेंव्हा त्या ठिकाणी लवकरात लवकर नव्याने प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करावे अशी प्रवाशांची जोरदार मागणी आहे.