पृथ्वीला सूर्य सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. या पद्धतीने प्रत्येक वर्षातील 6 तास मिळून चार वर्षांनी 24 तास तयार होतात. त्यामुळे चौथ्या वर्षी एक दिवस अधिक असतो त्याला “लिप ईयर” म्हंटले जात असून यंदा 2020 हे लिप ईयर आहे. यापूर्वी 2016 मध्ये लीप ईयर होते.
वर्षात 365 दिवस असतात तर फेब्रुवारीत 28 दिवस असतात, पण चार वर्षातून एकदा वर्षात 366 दिवस तर फेब्रुवारीत 29 दिवस येतात हेच ‘लीप ईयर’ होय. एखाद्या वर्षाला 4 या संख्येने विशेष भाग जात असल्यास ते लिप ईयर असते. फेब्रुवारी महिना वगळता जानेवारीपासून डिसेंबर पर्यंतचे बारा महिने 31 किंवा 30 दिवसांचे आहेत. त्यामुळे एका वर्षात एकूण 365 दिवस येतात, तर दर चार वर्षांनी 366 दिवसांचे एक वर्षे येते. ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा एक दिवस वाढलेला असतो.
ज्या लोकांचा जन्म हा 29 फेब्रुवारीला असतो, ते लोक आपला वाढदिवस दरवर्षी साजरा न करता 4 वर्षांनी येणाऱ्या लिप ईयरमध्ये साजरा करतात. 2016 मध्ये 29 फेब्रुवारीला सोमवार होता, तर 2020 मध्ये 29 तारखेला शनिवार आहे. त्यानंतर 2024 मध्ये येणाऱ्या लीप लीप ईयर या वर्षात 29 तारखेला गुरुवार असणार आहे. “लीप ईयर” मागे कोणताही धार्मिक आधार नसून नैसर्गिक कारणे आहेत.
दरम्यान, रोमचा दुसरा सम्राट नुमा पाॅम्पिलियस याचा शुभ-अशुभ, शकुन-अपशकुन यावर फारच विश्वास होता. वर्षातील एकूण 12 महिन्यांपैकी फेब्रुवारी हा शुभ आहे असे त्याला नेहमी वाटत असेल होते. त्यामुळे हा महिना प्रत्येकाला निर्विघ्नपणे जावा या अंधश्रद्धेतून त्याने फेब्रुवारीचे कांही दिवस कमी केले. सम्राट नुमा पाॅम्पिलियसने हा महिना दोन ते तीन दिवसांनी कमी करून म्हणजे तो 28 दिवसांवर आणला असे सांगितले जाते मात्र याला ठोस पुरावा नाही.