कपिलेश्वर मंदिरातील पौराणिक भीत्तीमूर्ती भाविकांच्या कौतुकास पात्र ठरत असून या भित्तिचित्रांद्वारे हिंदू देव-देवतांसंदर्भात पौराणिक माहिती दिली जात असल्यामुळे सध्या कपिलेश्वर मंदिरात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीचे अभ्यास दौरे होत आहेत.
कपिलेश्वर मंदिरातील नव्याने उदघाटन झालेले भीत्तीमूर्तींचे सभागृह पहाण्यासाठी सध्या शालेय विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दीड कोटी खर्चून उभारलेले
श्री शिवशंकरच्या जीवनचरित्रातील प्रसंग साकारलेले भीत्तीमूर्तीचे सभागृह हे या गर्दी मागचे मुख्य कारण आहे. भोलेनाथ श्री शिव शंकर यांनी केलेले दैवी कार्य आणि तत्कालीन प्रसंग हुबेहूब कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात भीत्तीमूर्तीद्वारे साकारण्यात आले आहेत.
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचे खूळ डोक्यात घेतलेल्या आजच्या मुलांपैकी बहुतांश मुले आपल्या हिंदू देव देवतांबद्दल अनभिज्ञ आहे. शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमातमधूनही पौराणिक कथा हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिरातील सभागृह हे अत्यंत आदर्शवत ठरले आहे. सध्या शिवशंकराच्या बाबतीतील माहिती जाणून घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी होत आहे. कोट्यावधी रूपये खर्च करून आम्ही हे सभाग्रह उभारले असले तरी सध्या होणारी विद्यार्थ्यांची गर्दी हीच आमच्या यशाची पोचपावती आहे, असे मत कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळींकडून व्यक्त केले जात आहे.
कपिलेश्वर मंदिराला आज बुधवारी सहलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सदर सभागृहाचे उद्घाटन आणि त्याबाबतची प्रसिद्ध झालेली माहिती पाहून शिक्षकांनी शाळेतील मुलांवर चांगले संस्कार व्हावे तसेच महाशिवरात्रीचे महत्व समजावे यासाठी त्यांना संपूर्ण सभागृह फिरून दाखविले. यावेळी प्राथमिक कन्नड माध्यमाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच भरतेश इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. देवस्थान विश्वस्त मंडळाच्यावतीने त्यांचे स्वागत करून माहिती देण्यात आली.
कपिलेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विनायक किनेकर आदी उपस्थित याप्रसंगी उपस्थित होते.
कपिलेश्वर मंदिराच्या या सभागृहात व्यासपीठाच्या मध्यभागी नवनाथ महाराजांच्या प्रतिमा असणारे फायबर मटेरियलपासून निर्माण केलेले थ्री डी स्वरूपातील पॅनल उभारण्यात आलेले आहे. याशिवाय श्री शिवशंकरच्या जीवनचरित्रातील गंगावतार, अमृतमंथन, त्रिपुरासुराचा वध, गोकर्ण आत्मलिंग, पार्वतीदेवी सती प्रसंग, कैलास पर्वत गर्वारोहन असे काही प्रसंग सादर करणाऱ्या पॅनल ( भित्तिमूर्ती ) सभागृहात साकारण्यात आल्या आहेत. लांजा-रत्नागिरी येथील कलाकार संदीप यांनी या भित्तिमूर्ती घडविल्या आहेत.