व्हिटीयूचा 19 वा पदवीदान समारंभ 8 फेब्रुवारी रोजी होणार असून इस्रोचे अध्यक्ष डॉ.के शिवन यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती उपकुलगुरु करीसिद्धप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उप मुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांच्या अध्यक्षतेखाली पदवीदान कार्यक्रम होणार आहे.राष्ट्रीय मान्यता मंडळाचे अध्यक्ष प्रा के के अगरवाल यांचे पदवीदान प्रसंगी भाषण होणार आहे.
46588 बीई,744 बी अर्च,4479 एमबीए,1260 एमसीए,1532 एम टेक,38 एम अर्च,479 पी एच डी ,21 एम एस सी पदव्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.कुलसचिव आनंद देशपांडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.