“हम नही सुधरेंगे” असे म्हणत रहदारी नियम बेळगांववासीय कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याची प्रचिती आज सोमवारी उद्यमबाग येथील चौथ्या रेल्वे गेट येथे आली.
“हम नही सुधरेंगे” असे म्हणत रहदारी नियम बेळगांववासीय कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याची प्रचिती आज सोमवारी उद्यमबाग येथील चौथ्या रेल्वे गेट येथे आली, जेंव्हा येथील दुतर्फी मार्गावर वाहनचालकांनी एकच गर्दी केली होती. रहदारी नियमानुसार ज्या ठिकाणी दुतर्फी मार्ग आहे तेथे डाव्या बाजूच्या रस्त्याने वाहनांनी पुढे जायचे असते तर उजव्या बाजूचा मार्ग समोरून येणाऱ्या वाहनांसाठी खुला ठेवावा लागतो. तथापी 4थ्या रेल्वे गेट याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत असल्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये भांडणे, वाहनांचे नुकसान आदी प्रकार घडत असतात.
उद्यमबाग चौथ्या रेल्वे गेटप्रमाणे शहरात अन्यत्रही बेळगावातील वाहनचालकांकडून अशाच प्रकारे रहदारी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे सर्रास पहावयास मिळत आहे. ही परिस्थिती पाहता एखादा अपघात अथवा वाहतूक कोंडीचा प्रसंग घडला तर त्यासाठी रहदारी पोलीस खात्याला जबाबदार धरण्यात काय अर्थ? एखाद्या ठिकाणी साधे वळण घ्यावयाचे असल्यास आपले वाहन इंडिकेटर दाखवत ज्या दिशेला वळायचे आहे त्या बाजूला घ्यावे इतके साधे भान बहुतांश वाहनचालकांना नसते.
परिणामी मागून येणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आपण स्वतःहून रहदारी नियमांचे पालन केले तरच इतर लोक त्याचे अनुकरण करू शकतात. यामुळे अपघात, वाहतूक कोंडी, भांडणे आदी प्रकार निकालात निघू शकतात याचे भान बेळगावातील वाहनचालकांना केव्हा येणार? असा सवाल जागरूक नागरिकांकडून केला जात आहे.
अहो बेळगावकरानो लोक तुमची लायकी कढायचा तरी सुधररा