Friday, April 26, 2024

/

वडगांवात युवकांवर खुरप्याने हल्ला

 belgaum

उघडय़ावर लघुशंका करू नकोस, असा सल्ला देणाऱया तरुणावर त्याच्या मित्राने खुरप्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव येथे घडली आहे. सोमवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

वसंत बाबू सुणगार (वय 23) रा. लक्ष्मी गल्ली, वडगाव असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी विनायक केदारी हजेरी (वय 25) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

कनकदासनगरजवळ उघडय़ावर लघुशंका करणाऱया विनायकला वसंतने रोखले होते. त्यामुळे वादावादी झाली होती. वादावादीनंतर रात्री आठच्या सुमारास विनायकने वसंतवर खुरप्याने हल्ला केला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.