येळ्ळूर साहित्य संमेलनात विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभागी होऊ नये म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना आडकाठी आणली आहे.
सी आर पी अधिकाऱ्यांनी साहित्य संमेलनात शिक्षक व विध्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये यासाठी दबाव आणला आहे जर का शिक्षकांनी संमेलनात सहभाग दाखवला तर पगार रद्द करू अशी तंबीही दिली आहे यामुळे या संमेलनात विद्यार्थी गणवेश न परिधान करता सहभागी झाले आहेत.
या दिंडी व संमेलनाचे पोलिसांकडून व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे.यामुळे कर्नाटक सरकार पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी भाषा,संस्कृती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सतत मराठी भाषा आणि संस्कृती दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार विविध मार्गाने करत आहे.महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्त्याना साहित्य संमेलनाला बोलवू नका अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या आयोजकांच्या बैठकीत केली होती.मराठी भाषिकाचे सांस्कृतिक,साहित्यिक कार्यक्रम कर्नाटक सरकारच्या डोळ्यात नेहमी खुपतात त्यामुळे येनकेन मार्गाने कार्यक्रमांना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातआहे.
दरम्यान येळ्ळूर येथील 15 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीस सुरुवात झालो असून शेकडो विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत- जेष्ठ साहित्यीक उद्धव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.