Monday, May 6, 2024

/

देणगी दिलेल्या पैशातून केली मदत

 belgaum

अनेक जण सामाजिक भान ठेवत जनसेवा करत असतात तर काहीजण जनसेवेसाठी रात्रंदिवस झटत असतात असेच एक ग्रामीण भागातील मंडळ आहे यांनी देणगी दिलेल्या पैशातून रुग्णांना मदत केली आहे

बेनकणहल्ली भागातील ब्रह्मलीन युवक मंडळ यांच्याकडून गरिब रुग्णांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्यात आले आहे. कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता गणेशोत्सव काळात देणगी स्वरुपात आलेल्या पैसा अनेक रुग्णांना मदत करून एक नवा वसा जपला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

ब्रह्मलिंग युवक मंडळाने यामागेही अनेकांना सहकार्य केले आहे. त्यांचा हा सामाजिक कार्याचा वसा कायम सुरूच ठेवणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. कोणत्याही गरीब रुग्णांना मदत करून ते आपले कार्य आणि समाजहित जपत असतात. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यापुढेही त्यांचा आदर्श अनेकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.