जगात शैक्षणिक दर्जात अव्वल असणारे लंडन येथील केंब्रिज स्कुल बेळगावात येणार आहे.
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या पुढाकाराने केंब्रिज इंटर नॅशनल मोंन्टेसरी प्री स्कुल येत्या शैक्षणिक वर्षांपासून बेळगावात सुरू होत आहे.भातकांडे यांच्या पुढाकाराने कुंतीनगर, टीचर्स कॉलनी खासबाग येथे सुरू केंब्रिज स्कुल सुरू होणार असून शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी बेळगाव आणि परिसरातील विध्यार्थाना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी भातकांडे शाळेने केंब्रिज स्कुलशी समनवय करार केला आहे.
केंब्रिज स्कुलच्या देशभरात 170 शाखा असून उत्तर कर्नाटकातील बेळगावात सुरू होणारी ही पहिली शाळा असणार आहे. केंब्रिज स्कुलमध्ये एलकेजी पासूनच विध्यार्थाना आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जाते तसेच या वर्ग खोल्यांची रचना विविध रंगाची असणार आहे.
केंब्रिज स्कुल मध्ये मिळणारे शिक्षण जागतिक दर्जाचे असल्याने बेळगावकराना एक चांगले स्कुल उपलब्ध होणार असून स्कुल मध्ये प्रवेश देण्यासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. भातकांडे शाळेतर्फे कुंतीनगर येथे प्रशस्त अशा दोन एकर जागेत नवीन शाळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून या ठिकाणी भव्य इमारतीसह मैदान, आधुनिक लॅब, वाचनालय, स्मार्ट बोर्ड रुम्स, संगणक खोली यासह डायनिंग हॉल व इतर अनेक सुविधा असणार आहे.
सध्या शाळेचे वेगाने काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळा व पदवीपूर्व महाविद्यालय आणि कुंती नगर खासबाग येथील केंब्रिज मोंन्टेसरी प्री स्कुल अशा शाळा दोन शाळा पालकांना उपलब्ध झाल्या आहेत