Tuesday, December 24, 2024

/

दुचाकी अपघातात येळ्ळूरच्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

 belgaum

दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला येळ्ळूर गावचा सुपुत्र सुरज पाटील त्याचा उपचार सुरू असताना दुर्दैवी अंत झाला. त्याच्या निधनाने येळ्ळूर गावावर शोककळा पसरली आहे.

अपघातात आकस्मिक मृत पावलेला 25 वर्षीय सुरज नारायण पाटील धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता होता. याबाबतची माहिती अशी की, सुरज मंगळवारी रात्री दुचाकीवरून येळ्ळूरहून बेळगावला येत होता. त्यावेळी वाटेत अचानक दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. या अपघातात सुरज पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी लागलीच त्याला उपचारासाठी नजीकच्या खासगी इस्पितळात दाखल केले. तथापि दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने दुर्दैवाने आज बुधवारी उपचार सुरू असतानाच सुरतचा मृत्यू झाला.

या घटनेचे वृत्त कळताच येळ्ळूर गावातील शेकडो तरुण हॉस्पिटलच्या आवारात जमले होते. सुरज नारायण पाटील हा धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता होता. येळ्ळूर गावांमधील प्रत्येक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तो नेहमी आघाडीवर असायचा. गावकऱ्यांसाठी तो कुटुंबातील सदस्य होता.

संक्रांत सणा दिवशीच सूरजवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे येळ्ळूर ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत. सदर अपघाताची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.L

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.