चार वर्षांची वाघीण आणि तीन बछडे महादई वन्यजीव अभयारण्यात मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.पश्चिम घाटाच्या रांगातील कर्नाटकला लागून असलेल्या गोव्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
मृत वाघिणीचा मृतदेह कुजायला सुरुवात झाली होती.वाघीण एक आठवड्या पूर्वी मृत झाली असावी असा अंदाज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
वाघिणीचा सत्तर टक्के कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सापडला.वाघिणीची नखे गायब झाली आहेत.शेतकऱ्यांच्या जनावरांवर वाघीण हल्ले करून फस्त करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी वाघीण आणि तिच्या तीन बछड्याना विषप्रयोग करून मारले असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी तीन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव कर्नाटकाच्या जंगल हद्दी पासून जवळच असलेल्या गोव्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.