बेळगाव शहर आणि परिसर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या व्याप्तीत येऊन बरीच वर्षे उलटली तरी बेळगाव शहराला पोलीस कमिशनरची स्वतःची नवीन इमारत झाली नव्हती अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता.अखेर बेळगाव शहर पोलिसांना नवीन पोलीस आयुक्त कार्यालय मिळणार आहे.
कधी शासनाकडून दिरंगाई कधी सरकार मध्ये बदल तर कधी जागा निश्चिती मुळे नवीन इमारतीचा प्रश्न प्रलंबित होता अखेर शहराच्या मध्यभागी सिटी लाईन परिसरात हाय-टेक सिटी पोलिस कमिशनर ऑफिस करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य गृहनिर्माण व पायाभूत सुविधा विकास महामंडळाने वर्ग -1 आणि वरील कंत्राटदारांकडून इमारतीच्या ठेकेसाठी निविदा मागविल्या आहेत.
सध्या शहर पोलिस आयुक्त कार्यालय हे पोलिस अधीक्षकांच्या जुन्या कार्यालयीन इमारतीपासून तात्पुरते काळांसाठी कार्यरत आहे. सिटी लाइन भागात पोलिस विभागाकडे पुरेशी जागा असून, लिंगराज कॉलेजला संलग्न असून येथे नवीन कार्यालयाची इमारत अंदाजे 12.79. कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे.
ही अल्प मुदतीची निविदा असल्याने लवकरच इमारतीचे काम सुरू होईल. तथापि, इमारतीच्या वैशिष्ट्यांविषयी तपशील येणे बाकी आहे. शहर पोलिस आयुक्त एस बी लोकेशकुमार म्हणाले की, पोलिस विभागातील स्वतंत्र शाखा काम पाहत आहे लवकरच बेळगाव साठी सुसज्ज असे नवीन पोलीस आयुक्त कार्यालय असेल.