सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारे यंदाचे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पत्रकार पुरस्कारांमध्ये मराठी विभागासाठी तरुण भारतचे वार्ताहर एन. ओ. चौगुले यांची तर कानडी विभागात कन्नड प्रभाचे वार्ताहर सी. ए. इटनाळमठ यांची निवड झाली आहे. तसेच स. रा. जोग महिला पुरस्कार वेणू ध्वनीच्या निवेदिका मनीषा सरनाईक व कन्नड विभागासाठी जयश्री अब्बिगेरी यांना देण्यात येणार आहे. रोख रक्कम मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदानंद सामंत, विलास अध्यापक, अनिल आजगावकर व डॉ. सर्जू काटकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत, उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर, कार्यवाह नेताजी जाधव, सहकार्यवाह ॲड. आय. डी. मुचंडी यांच्यासह अभय कोण सदस्य अभय याळगी, अनंत जाधव, तळेकर, अनंत जांगळे व सुनीता मोहिते आदी उपस्थित होते.
गोगटे रंगमंदिर येथे शनिवार दिनांक 18 रोजी सायंकाळी 5.30 वाजता व्याख्यानमालेचे उद्घाटक संजय राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.