व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी आणि गैरसोय संदर्भात मर्चंट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) अध्यक्ष आणि सचिवांना निवेदन सादर करण्यात आले.
मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरूचे व उपाध्यक्ष चेतन खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेले सदर निवेदन एपीएमसी अध्यक्ष आनंद पाटील यांनी स्विकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. व्यापारी बंधुंच्या मागण्यांपैकी प्रामुख्याने मालमत्ता खरेदी, दुकान नाव नोंदणी व वारसा करून दुकान व्यापाराच्या नांवे एपीएमसी दप्तरी नोंद करणे, एपीएमसीचे शुल्क न भरता व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणे, रस्ते- लाईट व पाण्यांची उत्तम सोय करणे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. निवेदन स्वीकारल्यानंतर बोलताना अध्यक्ष आनंद पाटील यांनी आजच एपीएमसी मार्केट कमिटीची बैठक असून त्यामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या प्रलंबीत फायलींचा प्रश्न निकालात काढू असे सांगून पाणी, लाईट, रस्ते आदी समस्यांचे निवारण करू, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी मर्चंट असोसिएशनचे सचिव माणिक होनगेकर, खजिनदार विनायक होनगेकर, व्यापारी प्रतिनिधी महेश फौजी कुगजी सदस्य आर के पाटील तानाजी पाटील मनोज मत्तिकोप लगमा नाईक, सुधीर पाटील, दत्ता पाटील, राहुल होनगेकर, विक्रमसिंह कदम- पाटील, नरसिंह पाटील, सुरेश जाधव, मोहन कुट्रे, समशेर अली अन्सारी, राजू जाधव, व्यापारी एन. एस. कडूकर, हेमंत पाटील, दत्ता नाकाडी, कृष्णा पाटील, मोहन बेळगुंदकर, एम. जी. मरणहोळकर, आर. बी. पाटील, बी. के. तरळे, विश्वास घोरपडे, गजानन घोरपडे, अशोक बामणे, सी. व्ही. खानोलकर, बंडू मजुकर, राजू हंगिरकर, सुरेश नार्वेकर, बाळू पाटील, राहुल देसुरकर, विनायक पाटील, वामन पाटील, विनोद होनगेकर, रामा पाटील, पिंटू परूळेकर, दीपक होनगेकर, डी. बी. देसाई, महेश देसाई, तानाजी इरोजी भैरू पाटील, विनायक मोरे आदी व्यापारी उपस्थित होते.