जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या डोके दुःखी ठरू लागले आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सोमवारी इमारतीचे काम बंद करून पार्किंगची समस्यां सोडवा अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा वकिलांनी दिला आहे. त्यामुळे तूर्तास तरी इमारतीचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. खुल्या जागेमध्ये मोठी न्यायालयीन इमारत उभे करण्यात येत आहे. या इमारतीमध्ये पार्किंगची सोय करावी, अशी मागणी वकिलांनी मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे केली होती. त्यांनी आश्वासनही दिले होते. मात्र कंत्राटदाराला विचारले असता पार्किंग साठी जागा नसल्याचे सांगितले. यामुळे वकिलांनी ते काम बंद पाडविले आहे.
प्रथम पार्किंगची सोय करा त्यानंतरच कामाला सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले . न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. दुचाकी प्रमाणेच आता चार चाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात जागा मिळणे कठीण झाले आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात यापूर्वी लोकअदालतच्या इमारतीसमोर खुली जागा होता. त्या ठिकाणी पार्किंग केले जात होते. पण आता त्याठिकाणी भव्य इमारत उभी करण्यात येत आहे.
विविध न्यायालयासाठी ही इमारत बांधण्यात येत आहे. त्यामुळे पाकिंगची समस्या गभीर बनत चालली आहे. इमारतीचे काम सुरु करताच वकिलानी मुख्य न्यायाधीशाची भेट घेऊन तळ मजल्यामध्ये वाहनांसाठी पार्किंगची सोय करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी न्यायाधीशानी पार्किंगची सोय करु, असे आश्वासन दिले होते.
सध्या या इमारतीचे कॉलम उभे करण्यात आले आहे. याचबरोबर मातीचा भरावही टाकण्यात आला आहे. यावेळी काही वकिलानी पाकिंगसाठी सोय आहे की नाही याची चौकशी केली असता कत्राटदाराने पार्किंगला जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वकिलानी इमारतीला विरोध केला आहे. पार्किगची सोय करा त्यानतरच काम सरु करा असे सुनावण्यात आले आहे.