बेळगाव शहर आणि परिसराला धुक्याच्या दाट शालीने लपेटले असून लोक धुक्यात फिरण्याचा आनंद घेतला.
पहाटे चार पासून पडलेलं धुकं सकाळी पर्यंत देखील कमी होत नव्हतं सकाळचे सात वाजले तरी रस्त्यावर समोरची व्यक्ती दिसत नव्हती साडे आठ पर्यन्त धुकं कायम होत.
सकाळी धुके सगळीकडे पसरल्यामुळे लोकांनी धुक्यात फिरण्याचा आनंद तर घेतलाच शिवाय सेल्फीही काढून घेतली.रेस कोर्स असो जुने पी बी रोड येळ्ळूर रोड,कॅम्प सावंगाव रोड,शिवाजी उद्यान आणि शहरातील विविध मैदानात धुक्याची सकाळ पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.शहराचे कमाल तापमान 12 वर घसरले असून गारठा वाढला होता.नेहमी सकाळी शाळेला जाणाऱ्यांनी गरम कपडे परिधान करून जाने पसंद केलं.
सलग तिसऱ्या दिवशी बेळगावात दाट धुके पसरले असून त्यामुळे वातावरणात कमालीचा गारठा देखील निर्माण झाला आहे.सकाळचे नऊ वाजले तरी सुर्यादेवाचे दर्शन आज झाले नाही.