परिवाहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचा अपशब्द वापरून केलेल्या वक्तव्या विरोधात महाराष्ट्रासह सीमा भागात संतापाची लाट आहे.खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सवदी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
लक्ष्मण सवदी यांच्यासह कर्नाटकातील काही नेते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईतराबाबात अश्लाघ्य वक्तव्य करत आहेत. त्यासाठी कर्नाटक सरकार यांना वेळीच आवर घालावा अन्यथा समिती कार्यकर्ते पेटून ऊठतील याला कर्नाटक सरकार जबाबदार राहील असा इशारार देण्यात आला आहे.
ज्यांनी विधानसभा सभागृहात पोर्न व्हीडिओ पाहून आपली नैतिकता जगजाहीर केली आहे त्यांनी आपली बुद्धी तपासून घ्यावी असा टोला खानापूर समितीने सवदी यांना लगावला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूरात झालेल्या तातडीच्या बैठकीत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. याबैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दिगंबराव पाटील होते.
17जानेवारीला सकाळी आठ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहेअसा निर्णय झाला तसेच समितीचे एकनिष्ठता कार्यकर्ते सयाजीराव गुणाजीराव देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रकाश चव्हाण विवेक गिरी मुरलीधर पाटील महादेव घाडी विलासराव बेळगावकर यशवंत बिरजे यांची भाषणे झाली शेवटी आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.