बेळगाव शहर आणि उपनगरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले असून सोमवारी चार पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात साथ चोरी झाल्याची घटना उघडकीस आले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ माजली असून संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यक्त होत आहे.
एका एपीएमसी पोलीस स्थानकात चार चोर्या झाल्याची घटना नोंद आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावत असून पोलिस प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी दिवसभरात सात चोर्या झाल्यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ माजली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने घेऊन पोलिसांनी चोरट्यांचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरातील कॅम्प, माळ मारुती, एपीएमसी आणि शहापूर पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्र या चोर्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर चोरांचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सुमारे पाच ते दहा लाखापर्यंत ऐवज चोरट्यांनी लंपास केले आहेत. मात्र काहींनी या तक्रारी नोंद करून घेण्याची कानाडोळा केला आहे. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या सार्या घटना दिवसभरात घडल्या असून सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत या साऱ्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे याच्यापुढे तरी पोलिस प्रशासनाने जागरूक राहून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यक्त होत आहे. एका दिवसात सात चोऱ्या तर याआधीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. या चोऱ्यामध्ये इराणी टोळी आहे की स्थानिक आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र सोमवारी घडलेल्या घटनांमुळे एकच खळबळ माजली आहे.