मंगळवारी मंगळुरू विमान तळावर जीवंत बॉम्ब ठेवणारा आदित्य राव हा देशद्रोही आहे की कोणत्या धर्माशी संबंधित आहे असा सवाल माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.आरोपी पोलिसांना शरण गेल्यामुळे पोलीस तपासात सर्व काही बाहेर येईलच मात्र तपास पूर्ण व्हायचंय अगोदर त्याला मानसिक रुग्ण म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केलाय.
आरोपी आपला असल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी दिली जात आहे असा आरोप त्यांनी भाजपा नेत्यांवर करत आरोपी कोणत्याही जाती धर्माचा असेल तर तो देश द्रोहीच असे त्यांनी म्हटले.
एकीकडे पोलीस तपास सुरू असताना भाजप नेते हा आरोपी मानसिक रुग्ण आहे अशी वक्तव्ये करीत आहेत ते कितपत योग्य आहे?असा प्रश्न उपस्थित करत दिल्ली विधानसभा निवडणुकी नंतर के पी सी सी अध्यक्षाची निवड होणार आहे अनेकांनी अध्यक्ष पद हवे यासाठी मागणी केली आहे दोन ऐवजी चार कार्याध्यक्ष वाढवा अशी मागणी होत आहे.मोठया पदासाठी अनेक जण इच्छुक असतात त्यामुळे गोंधळ अपेक्षित आहे असेही ते म्हणाले