पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे म्हणून ओळखले जाणारे मूळचे बेळगाव जिल्ह्यतील आणि सध्या दिल्ली येथे सेवा बजावत असलेले वरिष्ठ आय ए एस अधिकारी बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.अशोक दलवाई असे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव असून ते बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कौजलगी गावचे आहेत.
सध्या ते पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या ड्रीम प्रोजेक्त कमिटीचे अध्यक्ष आहेत.यापूर्वी देखील बेळगावहून अधिक विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी देखील त्यांनी बेळगाव बाबत पत्रव्यवहार केलेला आहे.
आता ते बेळगाव ते दिल्ली अशी थेट विमामसेवा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत.बेळगाव ते जबलपूर आणि बेळगाव ते कोईमतूर अशी थेट विमानसेवा सुरू झाल्यास उद्योजकांना त्याचा उपयोग होईल असे बेळगाव दौऱ्यावर आलेल्या अशोक दलवाई यांनी सांगितले.
उडानच्या तिसऱ्या टप्प्यात बेळगाव दिल्ली विमानसेवा स्टार एअर कंपनीकडे मिळाली होती स्टार एअर ने हुबळी दिल्ली अशी विमान सेवा आठवड्यातुन तीन वेळा सुरू केली आहे.इंदिरा गांधी विमान तळ पालम ऐवजी सदर विमान सेवा गाझियाबाद हिंडन या विमान तळावर ही सेवा सुरू आहे.आता बेळगाव मधून थेट दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची मागणी झाली आहे.बेळगावात संरक्षण खात्याची असलेली सर्व कार्यालये त्यामुळे उत्तर भारतात थेट दिल्ली विमान सेवा उपयुक्त ठरू शकते.