काही पीडीओ आणि अधिकाऱ्यांनी संगणक उताऱ्यासंदर्भात बक्कळ पैसा कमविला आहे. मात्र आता काही शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत संगणक उताऱ्याचा घोळ संपता संपत नसल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतातच घर बांधायचे असेल तर संगणक उतारा महत्वाचा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात संगणक उतारा देणे बंद केल्याने अनेकांची अडचण होत आहे. अशा परिस्थितीत का यापूर्वी अनेकांनी संगणक उतारे घेऊन बक्कळ पैसा कमविला असला तरी सध्याच्या परिस्थितीत जी गरीब आहेत त्यांना संगणक उतारा नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.
तालुक्यात जी प्लस टू चा एम धाब्यावर बसून अनेकांनी टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. त्यामुळेच काही पिडीओ वर कारवाई करण्यात आली आहे. जी प्लस टू अनेक पीडीओ आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र अजूनही काही ग्रामपंचायत मध्ये असे कारभार सुरू केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार करून कारवाई करण्याची गरज असताना संगणक उतारा देण्याबाबत मात्र गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेनकणहल्ली येथे नुकतीच एका पीडीओला यासंबंधी निलंबित करण्यात आले आहे. तिची बदली सध्या रामदुर्ग येथे करण्यात आली असून अशा अनेक पीडीओवर यापूर्वी कारवाई करण्यात आली असली तरी अधिकारी मात्र सुधारले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. जी प्लस टू याचा अर्थ अनेकांना समजून देण्याची गरज असताना सध्या संगणक उतारा नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे संगणक उतारा गरीब शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.