बेळगाव शहरात सध्या थंडीचा जोर वबेळगाव शहर परिसरात सध्या थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेकांत हुडहुडी सुरू झाली असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. आता पुन्हा वातावरण थंडीचे बनले आहे. त्यामुळे अनेक जण उबदार कपडे खरेदी करण्याकडे वळू लागले आहेत.
बेळगावचा पारा पंधरा अंशावर आला असून अजूनही हा पारा 10 आमच्यावर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे अजूनही थंडीत मोठ्या प्रमाणात घट होणार असून याचा परिणाम आरोग्यावर ही होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे अनेकांनी उबदार कपडे घालूनच करावे अशा सूचनाही वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या आहेत.
दिल्ली येथे नुकतीच थंडीने हाहाकार माजविला आहे. त्याचा परिणाम आता बेळगावर दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्याचा पारा कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत मुंबई वरही याचा परिणाम जाणवला होता. आता बेळगावात ही मोठ्या प्रमाणात थंडीने कहर केला असून अनेक आतून घराबाहेर पडताना उबदार कपडे घालूनच बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सुरुवातीला सुरू होणारी गुलाबी थंडी गायब झाली आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरू झाली असून अनेकांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे याचा विचार करून हवामान खात्याने दक्षता घेण्याचे सांगितले आहे.