स्मार्ट सिटी प्रकल्पातील मध्यवर्ती बस स्थानक आणि सीबीटी स्टेशनला जोडण्यासाठी अंडरपास तयार करण्याबाबत स्मार्ट सिटी कार्यालयात प्रमुख बैठक घेतली.
या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.अंडरपासच्या बांधकामापूर्वी स्मार्ट सिटीचे एमडी शशीधर कुरेर यांनी अधिकाऱ्यांना वीज खांबांचे स्थानांतरण करण्यासह सर्व तयारी करण्याचे निर्देश दिले.
सेंट्रल बस स्टँड ते सीबीटी बस स्टँडपर्यंत प्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास करता यावा यासाठी हाय-टेक सीबीटी स्टेशन स्मार्ट सिटी प्रकल्पात बांधले जात आहे आणि अंडरपास तयार करण्यात येणार आहे.
अंडरपास कसा असेल याची उपयुक्तता काय याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्या नंतर कुरेर यांनी अंडरपास बांधकाम साइटला भेट देऊन विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या