Saturday, April 27, 2024

/

तालुका पंचायत समोर महिलांची निदर्शने

 belgaum

तालुक्यात सर्वच ठिकाणी उद्योग खात्रीची कामे सुरू असताना आंबेवाडी ग्रामपंचायतीला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मणुर गावातही उद्योग कात्रीतून कामे देण्यात आली नाहीत. त्यामुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून तातडीने काम द्यावे अशी मागणी उद्योग क्षेत्रातील रोजगार यांनी केली आहे.

उद्योग खात्रीतुन आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत यावर्षी कोणतेही काम देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत जर कामे दिली नाही तर आमच्या संसाराचा गाडा कसा चालणार असा सवाल उपस्थित करत तालुका पंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.

मागील वर्षीही आंबेवाडी ग्रामपंचायतमध्ये अशीच लक्तरे करण्यात आली. त्यामुळे येथील रोजगारांना कामापासून वंचित राहावे लागले. वारंवार तक्रार करून देखील संबंधित ग्राम विकास अधिकारी आणि तालुका पंचायत मधील अधिकारी रोजगार देत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार करून तातडीने काम द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 belgaum

मागील दोन महिन्यापासून आम्ही संबंधित ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे रीतसर कामाची मागणी केली आहे. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष करून अनेकांना त्रास देण्यात धन्यता मानली आहे. याचा विचार करून तातडीने काम उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी शिवाजी कागणिकर यांच्यासह गावातील विविध कामगार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.