बेळगाव तालुक्यात संगणक उतारा बाबत अठरा पीडिओ निलंबित झाले आहेत तर अजूनही काही वर कारवाई सुरूच आहे. अशा परिस्थितीत संगणक उतार याबाबत अनेक आतून नाराजी व्यक्त होत असली तरी तालुक्यात आणि जिल्ह्यात याबाबत जिल्हा पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी निलंबनाचा सपाटाच सुरू केला आहे. याबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. मात्र यावर निर्णय शक्य झाला नाही म्हणून दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा पंचायत सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली होती. यामध्ये विशेष करून संगणक उतार याबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. निलंबित झालेल्या पिढीवर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे मोठा गदारोळ माजला होता. संगणक उतारा सक्तीचा करण्यात आल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र काहींनी यामध्ये बक्कळ पैसा कमावलाने निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संगणक उताऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र यांनी याबाबत दिनांक 10 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले आहे.
बुडा आणि महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात संगणक उतारे काढण्यात आले आहेत. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ही निदर्शनास आल्यानंतर निलंबनाच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा बुडा आणि महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून दिनांक 10 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बुडा आणि महानगरपालिका हद्दीत उतारे काढण्यात आल्याने संबंधित ग्राम विकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून ही बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या कारणास्तव संगणक उतारे देण्यात आले आहेत आणि ते किती दिले आहेत. याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतरच यावर निर्णय घेण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र यांनी सांगितले आहे.